मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने अभिनेत्री कंगना राणौतला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. 'मला दिलेली ही सुरक्षा हे प्रमाण आहे की, देशात कोणत्याही देशभक्ताची आवाज कुणीही थांबवू शकत नाही.' असं सांगत कंगनाने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. तर 'मला वाटलं अमित शहा हे मला काही दिवस मुंबईत न जाण्याचा सल्ला देतील. पण, त्यांनी भारताच्या एका मुलीने दिलेल्या वचनाचा मान राखला आहे. माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचा आदर राखला आहे' असं म्हणत कंगनाने अमित शहा यांचे आभार मानले आहे.
मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं अभिनेत्री कंगना शिवसेनेच्या निशाण्यावर आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी कंगनाला 9 तारखेला मुंबई पाय ठेवूनच दाखवं अशी धमकीच दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:
Post a Comment